शुक्रवार, डिसेंबर ०३, २०१०

माफ करा शंभूराजे......कसा होता संभाजी ? विचारताच प्रश्न,
येते उत्तर- होता ‘रगेल आणि रंगेल’,
कर्तुत्ववान शिवपुत्राचा इतिहास बाटवला गेला,
आणि आम्ही षंढासारखे पाहत राहिलो,
माफ करा शंभूराजे आम्हाला,
आम्ही नालायक ठरलो,
साडे तीनशे वर्षे मनुवादी भूतांची गुलामगिरी,
सहन करत राहिलो,
नाही आवाज उठला आमचा,
नाही लिहिला सत्य इतिहास तुमचा,
पराक्रमी शिवपुत्र आपण,
चालली तलवार आणि लेखणीही,
भडकली माथी संस्कृतीच्या धर्माच्या ठेकेदारांची,
मक्तेदारी माडीत काढल्याचा राग,
एकजात सगळे पेटून उठले,
ज्या घरचे खाल्ले, त्या घरचेच वासे मोजले,
तीनदा विषप्रयोग आणि एकदा कैदेचे आडाखे,
महाराज, आपले नशीब बलवत्तर,
म्हणून अपयशी ठरले स्वराज्याचे खरे शत्रू,
शिवराज्याभिषेकाला विरोध करणारे तेच,
आपल्या कैदेची स्वप्ने पाहणारेही तेच,
आपल्यावर विषप्रयोग करणारेही तेच,
आणि स्वराज्याच्या राख-रांगोळीसाठी प्रयत्न करणारेही तेच,
‘तेच’—कोण होते ते ?
नव्हते कोणी मुस्लीम, मराठे, बहुजन,
सारेच कसे काय ब्राम्हण ?
महाराज,
आज आमच्यावर आरोप केला जातो
ब्राम्हणांची निन्दानालस्ती केल्याचा,
आम्ही फक्त इतिहास सांगितला तरी निंदा नालस्ती,
आणि त्यांनी सर्व इतिहास बाटवला त्याचे काय ?
परंतु महाराज,
पुरोगामी महाराष्ट्रात असले प्रश्न विचारायचे नसतात,
नाही आम्हालाच अक्कल कारण,
आम्ही आपणाला निष्कलंक ठरवू पाहत होतो,
पण कसे बघवेल या धर्ममार्तंडाना,
विकाऊ जेम्स लेन द्वारे घेतला संशय जिजाऊंच्या चारित्र्यावर,
महाराज, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मावळ्याला स्वताच्या आईची विटंबना झाल्याचे दुःख झाले,
वेडात दौडले वीर मराठे बहात्तर,
आणि एकाच कल्लोळ उठला,
अतिरेकी, दहशतवादी आणि शेलक्या शिव्या,
पुरोगामी-प्रतिगामी-समाजवादी-गांधीवादी-कम्युनिस्ट सारे एक झाले,
जातीवर शेकले तर कशी तारांबळ उडते ते साऱ्या महाराष्ट्राने पाहिले
पण महाराज, आता काळजी नको,
आता घराघरात एकतरी विद्रोही ‘मराठा’ जन्मतोय,
करतोय चिकित्सा आणि स्वीकारतोय सत्य,
जेव्हा सनातनी विचारसरणी पुसून टाकण्यात होवू यशस्वी,
तेव्हाच महाराष्ट्र खऱ्या अर्थाने होईल धन्य.

6 टिप्पणी(ण्या):

Jonny म्हणाले...

far chhan kavita kelis mitra, mastach. ashach kavita kinva itar likhan karat ja.
chh. sambhaji maharaj ki jay
jay jijau jay shivray

Vikrant म्हणाले...

Hey nice poem, i like it.keep it up dude

shrikant म्हणाले...

phan chhan kavita lihilis mitra ,
jay jijau jay shivray

अनामित म्हणाले...

नमस्कार, मी संभाजी महाराजांवरचे संभाजी ब्रिगेडचे ब्लोग्स बघितले. त्यात म्हटले आहे की संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली नसून ब्राह्मणांनी केली आहे. ह्या घटने विषयी काही ऐतिहासिक संदर्भ आपल्याकडून मिळू शकले तर बहुमोलाची मदत होईल.

Prakash Pol, Karad. म्हणाले...

Anonymus- संभाजी राजांच्या मृत्युमागे कोणती धार्मिक कारणे आहेत त्याचं उहापोह करणारा इतिहासकार आणि संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा लेख शिवधर्माच्या खालील लिंकवर वाचा.

http://www.shivdharma.com/Article_shrimantkokate5.asp

Bhanudas Rawade म्हणाले...

हे असेल फालतू लेख कोणीच वांचू नका

ह्यांच्या लेखाला कसला ही ऐतिहासिक संधर्भ नसतो
फक्त मला अस वाटत
आणि मला तस वाटत ह्या अधारे हे लोक पाहिजे ते लिहितात
तो इतिहास नाही तर याना काय वाटत ते लिहिलेल असत

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes