बुधवार, डिसेंबर ०१, २०१०

छत्रपती शिवराय आणि अफझलखान वध

अफजल खान वध हा इतिहास 
आहे. त्याला विरोध करण्याचे 
काहीच कारण नाही.
अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार होता . शिवरायाना संपविण्याचा विडा त्याने उचलला होता आणि त्यासाठी तो स्वराज्यावर चालून आला होता . स्वराज्याचा शत्रु या दृष्टीने शिवाजी महाराज त्याच्याकडे पाहात होते . याला धार्मिक रंग अजिबात नव्हता . शिवरायानी अफजल खानाला ठार मारले नसते तर राजांचेच काही बरे वाईट होण्याची शक्यता होती . कारण अफजल खान कपटी म्हणुन प्रसिद्ध होता . त्यामुळे शिवराय सर्व तयारीनिशी खानाच्या भेटीस गेले होते . खानाने महाराजाना आलिंगन दिल्यानंतर खानाने महाराजांच्या पाठीत कट्यारीने वार केला . परन्तु चिलखत असल्याने महाराज बचावले व चपळाइने त्यानी वाघनखे खानाच्या पोटात घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला .
तेवढ्यात राजांवर धावून आलेल्या सय्यद बंडाला जीवा महालेनी जागेवरच गार केला. हा झाला इतिहास . याला विरोध करण्याचे कारण नाही . परंतु यापुढे काय झाले ते जाणीवपूर्वक दुर्लक्षिले गेले आहे. अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याने शिवारायांच्या अंगावर वार केला. राजानी तो वार चुकविन्याचा प्रयत्न केला परंतु कपाळावर वार झालाच.
हा इतिहास का दाखवला
जात नाही ?
महाराजांच्या कपाळावर खोल जखम झाली. शिवरायांच्या आयुष्यात त्याना एकमेव जखम करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी  हिंदू-ब्राम्हण होता . परन्तु त्याला कधीच हायलाईट केले जात नाही . उलट इतकी गंभीर बाब इतिहासापासुंन लपवून ठेवण्याचे महापातक अनेक जण आजवर करत आले आहेत . ब्राम्हण म्हणुन कोण मुलाहिजा करू पहातो ?  हे शिवाजी राजांचे विचार . मग असे असताना अफजल खानाबरोबर कृष्णा कुलकर्णीचाहि इतिहास समाजासमोर मांडायला हवा, पण तसे होत नाही . जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्यासारख्या काही मराठा सरदारांचा स्वराज्याला विरोध होता . मग जावळीच्या मोरेंची जर शिवरायांचे शत्रु म्हणुन मांडणी केली जात असेल तर कृष्णा कुलकर्णीकडे केवळ ब्राम्हण म्हणुन दुर्लक्ष करायचे का ?  तोही स्वराज्याचा शत्रु होता ही बाब अग्रक्रमाने का मांडली जात नाही ?

अफजल खानाचा शिवरायानी वध केल्यानंतर त्यांच्यातील राजकीय शत्रुत्व (धार्मिक नव्हे ) शिवरायानी तिथेच संपवून टाकले. ज्या शत्रूला आपण स्वताच्या हाताने ठार केले त्याचीच कबर सन्मानपूर्वक प्रताप गडावर   उभारणारा राजा एकमेवाद्वितियच म्हणावा लागेल. शिवरायांचे मोठेपण नेमके याच्यात आहे. त्यानी कधीच परधर्माचा द्वेष केला नाही . पर्धर्मियाना नेहमी सन्मानाने वागविले .युद्धाच्या प्रसंगी कोणत्याही धार्मिक स्थळाना अथवा धर्मग्रंथाना हानी पोहचवायची नाही शिवरायांचा दंडक होता . परंतु आज नेमके त्याच्या उलट वर्तन चालले आहे . अफजल खानाच्या नावाखाली मुस्लिम द्वेष करायचा किंवा त्याना बोचेल अशी इतिहासाची मांडणी जाणीवपूर्वक करायची, असे प्रकार सर्रास घडत असतात. अफजल खान मुसलमान होता म्हणुन तो स्वराज्याचा शत्रु नव्हता  किवा तो स्वराज्याचा शत्रु होता म्हणुन सर्व मुसलमान स्वराज्याचे शत्रु आहेत, असेही कुणी समजू नये. सर्व जाती -धर्माचे मावळे शिवरायांच्या पदरी होते . दौलत खान दर्यासारंग हा मुसलमान त्यांचा आरमार प्रमुख होता. नुरखान बेग नावाचा मुसलमान त्यांचा घोडदळ प्रमुख होता . इब्राहिम खान नावाचा मुसलमान त्यांचा पायदळ प्रमुख होता.  काझी हैदर हा मुसलमान त्यांचा वकील, न्यायाधीश होता. मदारी मेहतर हाही त्यांच्या दरबारी आहे. मुसलमान मौनी बाबा त्यांचे गुरु होते . राजांच्या अंगरक्षकापैकी अर्धे मुसलमान होते आणि ही प्रामाणिक, जीवाला जीव देणारी माणसे होती. आयुष्यात त्यानी कधीही राजांशी गद्दारी केली नाही. असे असताना फ़क्त अफजल खान वध हे एकच प्रकरण समाजासमोर नेहमी मांडायचे आणि राजांच्या पदरी असणाऱ्या प्रामाणिक मुसलमान मावळ्याकडे दुर्लक्ष करायचे, हे कितपत बरोबर आहे . शिवरायांचे कर्तुत्व फ़क्त अफजल खान वधापुरते मर्यादित नाही याचे भान आम्ही ठेवणार आहोत की नाही ? शिवरायांच्या चरित्राचा चिकित्सक अभ्यास करून ते विचार , तो आचार आम्ही आमच्या आचरणात आणले तर “धार्मिक दंगली ” सारख्या वाईट घटना आम्ही टाळू शकतो.  मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात ना , “शिवाजी महाराज हे काही डोक्यावर घेवून नाचायाचे विषय नाहित तर डोक्यात घालायचे विषय आहेत .”

शिवरायांचे खरे चरित्र समाजासमोर मांडले पाहिजे.  शिवरायांचा लढा कोणत्याही जाती -धर्माविरुद्ध नव्हता तर स्वराज्याशी बेइमानी करणाऱ्या, इथल्या मातीवर अत्याचार करणार्या सैतानांच्या विरुद्ध होता.  शिवराय सर्वधर्म समभावानेच आयुष्यभर जगले.  त्यांच्या पश्चात आम्ही त्यांच्याच आचार विचाराना काळिमा फासला तर शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार आम्हाला उरणार नाही.

जय जिजाऊ , जय शिवराय !!

47 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes