बुधवार, डिसेंबर ०१, २०१०

परशुराम ; जोडण्याचे प्रतिक कि तोडण्याचे ?

एक फुल उमलले तर ते किती जणांना सुगंध देते ! त्याच्या पाकळ्या दही दिशांना आकृष्ठ करतात, आनंद देतात. ते एक फुल परिसरातील किती वातावरण प्रसन्नतेने भरून आणि भारावून टाकते. छोटेसे फुल, सृष्टीची इवलीशी निर्मिती, पण केवढी किमया, केवढी जादुगरी !

फुलाच्या तुलनेत माणूस कितीतरी विकसित, कितीतरी उन्नत, कितीतरी समृद्ध ! मग असा माणूस पुरेपूर उमलला, तर त्याच्या व्यक्तीमत्वाचा सुगंध कितीतरी दूरपर्यंत दरवळत राहील, कितीतरी हृदयना अत्तराचा स्पर्श देईल, कितीतरी मास्तकाना उमदेपणाच्या प्रेरणा देईल.

पण एक गोष्ट स्पष्ट आहे, द्वेषाचे आणि हिंसेचे निखारे पेरून या देशात सुखशांतीची फुले फुलवता येणार नाहीत, माणसे प्रसन्नतेने उमलाविता येणार नाहीत. कुराडीच्या घावाने फुलही उमलू शकत नाही आणि तिच्या धाकाने माणूसही उमलू शकत नाही.

जेथे सूड उगवतो- तेथे माणूस मावळतो !
जेथे सूड मरतो- तेथे माणूस जन्म घेतो !
आणि आपल्याला माणूस मावळू द्यायचा नाही,
मरू द्यायचा नाही !संदर्भ- परशुराम जोडण्याचे प्रतिक कि तोडण्याचे ?
लेखक- डॉ. आ. ह. साळुंखे.

1 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

WARIL KAVITA SUNDER AHE.SAMBHAJI BRIGADE/RASHTRAWADI CONGRESS WA RSS CHYA KARYAKARTYANA WACHUN DAKHWAWI.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes