सोमवार, नोव्हेंबर २९, २०१०

बळी !

 बळी !
सात काळजाच्या आत जपून ठेवावा, असा निरागस ‘माणूस’ ! आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता !! भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर !!!


बळी – हिराण्याकाशिपुचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचानाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व ! सुमारे साडे तीन ते पाच हजार वर्षापूर्वी होवून गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट, एक महातत्ववेत्ता !
या बळीचा वंश तो बळीवंश. या बळीवंशातील माणसे - आपली माणसे, आपल्या रक्तामासाची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे ! ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावणे पत्करले, पण तत्वांशी द्रोह केला नाही, आपल्या श्वासोच्छवासावर दडपणे लादून घेणे मान्य केले नाही, अशी माणसे.


आपण मात्र असे धन्य, कि आपण आपल्या डोळ्यादेखत त्यांच्या स्मृतीना खुशाल करपू-कोमेजू दिले; त्यांना आपल्या हृदयापासून सात तटांच्या आणि मस्तकापासून सात उंबरठ्याच्या बाहेरच रोखून धरले. या सगळ्याला थोडे अपवाद असतील, पण इतरापैकी काही जनानी त्यांना विसरून जाण्यात आपले सुख शोधले आणि काही जनानी तर त्यांची निंदा करण्यात पुण्याचा मार्ग पहिला. या लोकांना आज ना उद्या आपल्या अंतर्यामी असलेले त्यांचे अस्तित्व जाणवेल आणि त्या जाणीवेने त्यांचा स्व अक्षरशः मोहरून-बहरून येईल, असा विश्वास आहे. ज्यांनी त्यांचे महात्म्य आधीच ओळखले आहे, त्यांच्यापुढे मात्र आपण नतमस्तक व्हायलाच हवे ! 

बळी हा कुलस्वामी : महात्मा फुले

महात्मा फुले यांनी दस्युचा पोवाडा म्हणून जो पोवाडा लिहिला आहे, त्याच्या तिसऱ्या कडव्याची सुरुवातच त्यांनी ‘बळी राज्यादी कुळस्वमिला’ या शब्दांनी केली आहे. येथे ‘राज्यादी’ हा शब्द ‘राजादी’ या अर्थाने आला आहे. कारण, बळीच्या राज्याला कुळस्वामी म्हणणे, हे आशयाच्या दृष्टीने जुळत नही. याउलट बळीराजाचा तसं निर्देश करणे हे मात्र पूर्णपणे सुसंगत ठरते. महात्मा फुले बळीराजाला कुलस्वामी मानतात, याचाच अर्थ ते त्याला आपला अत्यंत आदरणीय पूर्वज मानतात. या उल्लेखाद्वारे ते एक प्रकारे बळीराजाबरोबरचे आपले नातेच सांगून टाकतात. कुळस्वामिकडे हल्ली देवता म्हणून पहिले जात असले, तरी कुळस्वामी म्हणजे मूळ पुरुष, हाच खराखुरा अर्थ आहे, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.


बळी राज्यादी कुळस्वामिला, डाग लाविला, दंग क्लेशांत !
अन्नावाचून होती हाल, केली कमाल, सर्व जगात !
संदर्भ- बळीवंश , लेखक डॉ. आ. ह. साळुंखे

8 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes