Monday, November 24, 2014

ऐसे कैसे झाले भोंदू

देव कोणाला म्हणावं ? संत कोण आहे हे कसं ओळखावं ? या प्रश्नांची उत्तरे संत तुकोबानी साडेतीनशे वर्षांपूर्वीच दिली आहेत. तुकोबा म्हणतात,
"जे का रंजले गांजले,
त्यासी म्हणे जो आपुला,
तोची साधू ओळखावा,
देव तेथेची जाणावा..."
साडेतीनशे वर्षांपूर्वी जे तुकोबांना उमगलं ते आज एकवीसाव्या शतकात आपणाला कळू नये यासारखी शोकांतिका नाही. दोन दिवसांपूर्वी हरियाणातील हिस्सार येथील रामपाल या तथाकथित बाबाला पोलीस कारवाई

Wednesday, November 19, 2014

गांधीजी कि नथुराम ?

'मी नथुराम...' नाट्यप्रयोगास सोलापूरात कांग्रेसचा विरोध (दै. लोकसत्ता, 12 नोव्हेंबर) ही बातमी वाचली. नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केल्याने भारतीय जनमानसात नथुराम खलनायक बनला आहे. पुरोगामी, गांधीवादी, समाजवादी विचारांच्या व्यक्तीनी वारंवार नथुराम गोडसेच्या या क्रुतीची निर्भत्सना केली आहे. परंतु संघ परिवारातील व्यक्तीनी मात्र प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नथुरामचे समर्थनच केले आहे. 

Wednesday, November 12, 2014

MPSC : सवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात बंदी अन्यायकारक

दै. लोकसत्ता, १३/११/२०१४
नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मागासवर्गीयांच्या खुल्या जागेवर होणार्या शिफारसीबाबत एक दुर्दैवी निर्णय घेतला आहे. मागासवर्गीयांसाठी असणार्या वय/परिक्षा शुल्क अशा प्रकारच्या कोणत्याही सवलतींचा लाभ मागास वर्गातील उमेदवाराने घेतला तर त्यांची खुल्या गटातील जागेसाठी शिफारस होणार नाही अशा प्रकारचा हा निर्णय आहे. दैनिक लोकसत्तामध्ये ही बातमी वाचनात आली. याआधी मागासवर्गीय उमेदवारांचे मेरिट खुल्या जागेच्या 'कट ऑफ' पेक्षा जास्त असेल तर त्यांची निवड खुल्या गटातून होत असे. समजा खुल्या गटाचे 'कट ऑफ' 100 पैकी 50 असेल, तर ज्या मागासवर्गीय उमेदवारांचे मेरिट 50 किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांची निवड खुल्या गटातून व्हायची. परंतु एमपीएससी च्या या सुधारित निर्णयानूसार मागासवर्गीयांसाठी असणार्या कोणत्याही सवलती या वर्गातील उमेदवाराने घेतल्या तर त्यांचा खुल्या गटावरील दावा नाकारला जाणार आहे. वास्तविक मागास वर्गांना आरक्षण देताना घटनेने त्यांना त्याच वर्गापूरते मर्यादित ठेवलेले नाही. आरक्षित जागेवर त्याच वर्गातील उमेदवार दावा करु शकतात. खुल्या जागा मात्र सर्वांसाठी असतात. त्यामूळे मागास वर्गातील उमेदवारांवर विविध बंधने लादून त्यांचा खुल्या जागेवरील दावा नाकारण्याचा प्रयत्न अन्यायकारक आहे.

Thursday, November 06, 2014

भारताचा पाकिस्तान होऊ नये

'हे कसले पाक' (6 नोव्हेंबर) हा अन्वयार्थ लोकसत्तामध्ये वाचला. पाकिस्तानच्या कोट राधाकिशन या गावात एका ख्रिस्ती दाम्पत्याला ईश्वरनिंदेच्या आरोपावरुन ठार मारण्यात आले. पाकिस्तान हा धर्मांध विचाराने कसा गुरफटला आहे त्याची प्रचिती आली. कट्टर धर्मांधता आणि त्यामाध्यमातून होणारा हिंसाचार ही सर्वच जगाची अतिशय गंभीर समस्या आहे. धर्म, धार्मिक प्रतिके यांची विटंबना किंवा निंदा केल्याच्या आरोपावरुन अनेकाना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानचे राज्यकर्ते, तिथले लष्कर आणि धार्मिक नेते यानी पाक मधील सामाजिक वातावरण नेहमीच गढूळ ठेवले. कट्टर धर्मांधता जोपासत त्यानी

Wednesday, November 05, 2014

एबीपी माझावर प्रमिती नरकेची मुलाखत

एबीपी माझावर प्रमिती नरकेची मुलाखत, { रिमोट माझा } सोमवार, दि. 3 नोव्हें. 2014, रोजी दु.१.३० वाजता आणि सायं.५.३० वाजता.} 

"तू माझा सांगाती" या आवली उर्फ जिजाई आणि संत तुकाराम यांची संसारगाथा साकारणार्‍या मालिकेतील आवलीची भुमिका प्रमिती नरके करीत असून, या मालिकेच्या प्रवासाबाबत प्रमितीची मुलाखत....

खालील लिंकवर हा विडिओ पाहू शकता.

http://abpmajha.abplive.in/videos/2014/11/03/article432238.ece/Remote-Majha--Chat-With-Awali#.VFnc3DO6Ywi

Saturday, October 25, 2014

भय इथले संपत नाही...

विधानसभेची निवडणूक नुकतीच संपली, ज्यामध्ये मतदारराजाने भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात तुलनेने जास्त मताधिक्य टाकले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या १५ वर्षे सत्तेत असलेल्या आणि कथित फुले-शाहू-आंबेडकरवादी सरकारचा जोरदार पराभव झाला. समतावादी भूमिका असलेल्या या आघाडी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रात खैरलांजी दलित हत्याकांड घडलं, जिथे भोतमांगे कुटुंबियांना दीर्घ प्रतीक्षेनंतर तुटपुंजा न्याय मिळाला. जातीय अत्याचार आणि दलितांवरील हल्ल्यांचे सत्र सर्वत्र वाढत असताना अहमदनगर जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाच्या हिंसेचे क्रौर्य वाढलेले दिसते. नेवासा येथील सोनई हत्याकांड असो की खर्डा येथे नितीन आगे या महाविद्यालयीन तरुणाचा केलेला खून, या प्रकारच्या हल्ल्यांमधून ना सरकारी यंत्रणा शहाणी झाली, ना अन्यायाला वाचा फोडणारे आपण यातून काही शिकलो आहोत!

Wednesday, October 22, 2014

खैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे...

दलित हत्याकांड हा समाजात नेहमीच ऐरणीवर असणारा विषय आहे. कारण वरचेवर देशात दलित समाजातील व्यक्तींवर अन्याय, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे पुरोगामी म्हणवला जाणारा महाराष्ट्र दलितांवरील अन्याय, अत्याचारात सर्वात पुढे आहे. सहा-सात वर्षांपूर्वीच सार्या समाजमनाचा थरकाप उडवणारे खैरलांजी हत्याकांड झाले. या बिभत्स हत्याकांडाने महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे सामाजिक वातावरण ढवळून निघाले. एकाच कुटूंबातील चार व्यक्तींची हत्या आणि त्या कुटुंबातील माय-लेकींवर झालेला बलात्कार याने कोणत्याही संवेदनशील माणसाचे मन द्रवले असेल. 

Monday, October 20, 2014

या सत्तेशिवाय जीव रमत नाही...

'या सत्तेत जीव रमत नाही' असं नामदेव ढसाळ म्हणाले होते. परंतु सध्याच्या राजकीय घडामोडी पहाता 'या सत्तेशिवाय जीव रमत नाही' असंच काहीसं चित्र आहे. भाजपची शिवसेनेबरोबर असलेली पंचवीस वर्षांची युती तुटली आणि काही क्षणातच राष्ट्रवादी कोंग्रेसनेही कोंग्रेससोबत असलेली पंधरा वर्षांची आघाडी मोडली. अगदी ठरवून केल्यागत सार्या गोष्टी पार पडल्या. भाजप आणि राष्ट्रवादीच्या या क्रुतीने दुखावलेल्या शिवसेना आणि कोंग्रेसने भाजप-राष्ट्रवादीची छुपी युती असल्याचा आरोप करायला सुरुवात केली. भाजपने हे आरोप फेटाळून लावले. राष्ट्रवादी आणि शरद पवारानी तर संघावर आणि भाजपवर अशा पद्धतीने हल्लबोल केला कि राष्ट्रवादीचे भाजपसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध असल्याचा संशय कुणाला येणार नाही.

Tuesday, October 07, 2014

राजकीय नेत्यानी ढोंग बंद करावे

युती आणि आघाडी तुटल्याने सर्वच राजकीय पक्षांचा खरा चेहरा समोर आला आहे. शिवसेना-भाजप युती अबाधित असताना या दोन पक्षांची वाटचाल एकाच दिशेने चालू होती. परंतू जशी युती तुटली तसे हे पक्ष एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करु लागले. उद्धव ठाकरे यानी मोदी, अमित शहा आणि इतर भाजप नेत्याना लक्ष्य केले. तर मोदी, शहा वगळता इतर भाजप नेत्यानी मात्र उद्धव याना धारेवर धरले. लोकसभेच्या वेळी राज ठाकरेंचे मोदीप्रेम ऊतू जात होते. भाजप नेत्यानी फटकारुनही राज ठाकरे यानी मोदीना

Saturday, October 04, 2014

ओबीसी राजकारणाची दशा आणि दिशा

'अच्छे दिन आयेंगे' म्हणत मोदीनी भारतीय जनतेला विकासाचे स्वप्न दाखवले आणि कांग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दहा वर्षांच्या बेजबाबदार कारभाराला कंटाळलेल्या जनतेनेही मोदीना भरभरुन प्रतिसाद दिला. गेल्या पंचवीस वर्षात पूर्ण बहूमत मिळवून भाजपा आणि मित्रपक्षांचे सरकार सत्तेवर आले. कांग्रेसचे तर पूर्ण पानिपत झाले. त्याना विरोधीपक्ष नेतेपदही राखता आले नाही. ममता बॅनर्जी

आरक्षण...आंदोलने आणि राजकारण...!

संजय सोनवणी, ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत.


यंदाचे वर्ष धनगर, कोळी, वडार, रामोशी, हलबा-कोष्टी अशा अनेक भटक्या विमूक्त समुहांतील जाती-जमतींच्या आरक्षणासाठीच्या उग्र आदोंलनांनी गाजले. त्याला विधानसभा निवडणुकीचीही पार्श्वभुमी होती. धनगर समाज तर प्रथमच एवढ्या प्रचंड सम्ख्येने रस्त्यावर उतरला. माध्यमांनी पुरेशी दखल घेतली नसती तरी स्वातंत्र्योत्तर काळात एवढा मोठा जनसमूह रस्त्यावर उतरल्याचे उदाहरण नाही. एकाच दिवशी ४०० ठिकाणी आंदोलने घडवायचा विक्रमही झाला. 

Wednesday, October 01, 2014

भारत-चीन संबंध: युद्ध व्यापाराच्या मैदानात...

प्रकाश पोळ.
--------------------------------------------------------

19 सप्टेंबरच्या सकाळमध्ये 'सावध ऐका,चिनी हाका' हा अग्रलेख वाचला. अग्रलेखात म्हंटल्याप्रमाणे भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंधामध्ये प्रगती साधण्यातील मुख्य अडथळा सीमाप्रश्नाबरोबरच परस्पर व्यापारातील तूट हाही आहे. गेल्या काही वर्षात चीनकडून होणारी भारताची आयात लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. परंतू भारत करत असलेली निर्यात मात्र त्या प्रमाणात वाढताना दिसत नाही. 1990-91 पर्यंत भारतासोबत

MPSC च्या निर्णयामूळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय

'मागासवर्गीयांसाठीच्या सवलती घेणार्यांची खुल्या गटातील पदांसाठी शिफारस नाही' हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय मागासवर्गीयांसाठी अन्यायकारक ठरणार आहे. वास्तविक पहाता मागास वर्गातील उमेदवार खुल्या वर्गातील आरक्षणासाठीही पात्र ठरतात. हेच आरक्षणाचे मूलभूत तत्व राज्यघटनेला

Thursday, September 11, 2014

बुडत्याचा पाय खोलात...

पणन संचालक सुभाष माने यांच्यावरील कारवाईचा निषेध 
 
सध्या आघाडी सरकारच्या विरोधात वारे फिरत असल्याने सत्ताधारी मंडळी बावचाळली आहेत. कधीही सत्तेबाहेर रहायची सवय नसलेल्या कोंग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता जाणार या भितीने अनेक उपद्व्याप सुरु केले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी अनेक बेकायदेशीर गोष्टी करण्यामुळे आघाडी सरकारचीच प्रतिमा मलीन होत आहे याचे त्याना भान राहिलेले नाही. पणन संचालक सुभाष माने यांच्यावरील कारवाई ही आघाडी सरकारने सूडबुद्धीने केली आहे हे सर्वानाच माहीत आहे. सध्याच्या काळात भ्रष्टाचाराचे पेव फुटले आहे. लोकप्रतिनिधी, मंत्री, अधिकारी आणि सामान्य माणूस असे सर्वच या भ्रष्टाचाराच्या चक्रव्युहात अडकले आहेत. यात एखादा

Thursday, September 04, 2014

वैभव रासकरला न्याय मिळेल का ?

कडेगाव हे सांगली जिल्ह्यातील तालूक्याचं गाव. या गावातील वैभव  रासकर हा हरहुन्नरी, गुणी खेळाडू. कुस्तीच्या क्षेत्रात वैभवने कडेगावचेच नाहितर सांगली जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. अतिशय गरीब आणि ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या वैभवने कुमार गटातील महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवून आपल्या कुटुंबीय, मित्र यांचा विश्वास सार्थ ठरवला. अवघ्या सतरा वर्षाच्या वैभवने ऑल इंडिया चॅपियनशीप मिळवली आहे. 

Tuesday, September 02, 2014

दहशतवादाची रुपे- पुस्तक परिक्षण

-महावीर सांगलीकर

दहशतवाद हा आज जगापुढील मोठा प्रश्न झाला आहे. पण दहशतवाद ही जगाला अजिबात नवीन नाही. त्याची मुळे प्राचीन काळापर्यंत जातात. प्रख्यात लेखक संजय सोनवणी यांनी आपल्या 'दहशतवादाची रूपे' या नवीन पुस्तकात आपल्याला माहित असलेल्या आणि नसलेल्याही अनेक प्रकारच्या दहशतवादाचा इतिहास मांडला आहे. लेखकाचा निष्कर्ष असा आहे धर्मवाद हाच जगातील दहशतवादाचे मुख्य कारण आहे. हा निष्कर्ष मांडण्याआधी लेखकाने वेगवेगळ्या धर्मांच्या इतिहासात त्या-त्या धर्मियांनी कसा दहशतवाद केला याची विस्ताराने चर्चा केली आहे.

मागोवा दलीत चळवळीचा

वैभव छाया.अभ्यासक आणि विचारवंत 

राजा ढाले - नामदेव ढसाळ यांच्या वादाची परिणीती  ही पँथरच्या फुटीत परावर्तीत झाली. राजा ढाले हे विद्यापीठी य शिक्षणातले मास्टर... तर नामदेव ढसाळ महाविद्यालयाचं तोंड देखील न पाहीलेला. पण त्याच्या कवितेनं भल्या भल्या सनातनी विद्यापीठांची बुरूजे मोडकळीला आणली होती. संघटनेत कोणाला जास्त भाव मिळतो या कारणास्तव उडालेल्या ठिणगीचं रुपांतर विस्तवात झालं. कालांतराने ह्या दोघांनीही त्यांच्या वादाला बुद्ध विरूद्ध मार्क्स असा मुलामा चढवण्याचा प्रय़त्न केला. पण ढाले आणि ढसाळ यांच्या वैयक्तिक इगो प्रॉब्लेम मुळे पँथर फुटली आणि पँथरचे कार्यकर्ते देशोधडीला लागले. यात दोषाचा सर्वात मोठा हिस्सा हा ढालेंच्याच वाट्याला यायला पाहीजे. 

Friday, August 29, 2014

गणपतीचा सिंधूकालीन इतिहास


गणपतीपूजनाचे भौतिक पुरावे आपल्याला सिंधू संस्कृतीकाळापासून मिळतात. हडप्पा येथे गणपती शीर्षाचे शिल्प मिळाले आहे. म्हणजेच भारतात गणपतीपूजन हे किमान पाच हजार वर्षं जुने आहे. तंत्र-गणपतीमुळे तो जगभर पसरला. अवैदिक शैवजनांचा गणपती कालौघात वैदिकजनांनीही आपले धर्मसंस्कार करत स्वीकारला. गणपती या दैवताचा विकास कालौघात कसा झाला याचा दैवतेतिहासाच्यासंदर्भात धर्मशास्त्राचे अभ्यासक  संजय सोनवणी घेतलेला रोचक धांडोळा...

Monday, August 18, 2014

धनगर आंदोलनातील हिंसा आणि त्याची प्रतिक्रिया

धनगर समाजाचे 14 ऑगष्ट रोजीचे महाराष्ट्रव्यापी आंदोलन खूप यशस्वी झाले. संपूर्ण राज्यात हे आंदोलन शांततेत पार पडत असताना बारामती, सातारा आणि फलटण या ठिकाणी काही हिंसक घटना घडल्या. बारामती आणि फलटण येथे काही एस. टी. गाड्यांची तोडफोड झाली तर सातारा येथे राष्ट्रवादीचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर एका कार्यकर्त्याने अबिर-बुक्का टाकला. राज्यभर इतर ठिकाणी मात्र आंदोलन शांततेत पार पडले. वास्तविक पहाता कोणतेही आंदोलन लोकशाही मार्गाने आणि घटनेच्या चौकटीत राहूनच करायला पाहिजे. परंतू विविध प्रश्नावर होणारी आजपर्यंतची आंदोलने पाहिली तर अपवादात्मक ठिकाणी हिंसक घटना घडलेल्या दिसतात. महात्मा गांधीनी स्वातंत्र्याच्या प्रश्नासाठी सुरु केलेले असहकार आंदोलन चौरीचौरा घटनेनंतर तहकुब करावे लागले. गांधीजीनी अहिंसक मार्गाचा अवलंब केला असला आणि आंदोलनाची दिशाही याच पद्धतीने निश्चित केली असली तरी लोकांचा रोष एवढा प्रचंड होता कि चौरीचौरा येथे पोलिस चौकी जाळून एकवीस पोलीस म्रुत्युमुखी पडले. या हिंसक घटनेला गांधीजींचे समर्थन नसतानाही त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हा आक्षेपार्ह प्रकार घडला. आजही महाराष्ट्र किंवा संपूर्ण देशभर होणारी आंदोलने पाहिली तर काही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. मनसे, शिवसेना, शेतकरी संघटना, मराठा आरक्षण आंदोलन या सर्व ठिकाणी हिंसक घटना घडलेल्या दिसतात.

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes